डॉ. सलील कुलकर्णी यांचा कोथरूड गणेश फेस्टिवल मध्ये विशेष सन्मान

पुणे ः आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांवर फुंकर घालत जगण्याचे पैलू उलगडणार्‍या कविता, प्रेम कविता, बालगीते सादर करून रसिक प्रेक्षकांच्या कविमानाला साद घालणार्‍या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि ख्यातनाम संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांनी ’आयुष्यावर बोलु काही’ हा बहारदार कार्यक्रम कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्य सादर केला.यावेळी डॉ. सलील कुलकर्णी यांना “एकदा काय झाले” ह्या चित्रपटासाठी राष्ट्रपती पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद, राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर इ मान्यवर उपस्थित होते. यानंतर आयुष्यावर बोलू काही चा प्रयोग सादर करण्यात आला.कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह श्रोत्यांनी भरगच्च भरले होते. त्यांच्या सर्व गाण्याला टाळ्या आणि शिट्यांनी दाद दिली. ’अग्गोबाई ढग्गोबाई’ या कवितांवर लहान मुला-मुलींनी ठेका धरत उपस्थित पालकांचे लक्ष वेधले.


आम्ही कोथरूडकर’तर्फे आयोजित व ‘संवाद पुणे’ निर्मित कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ यांचा कार्यक्रम झाला. यावेळी अदित्य आठल्ये यांनी तबल्यावर, राधिका अंतुरकर यांनी गिटारवर त्यांना साथसंगत दिली.


यावेळी सर्व कलाकारांचा सत्कार फेस्टिव्हलचे आयोजकांच्या हस्ते करण्यात आला. कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजक, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर, ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. मंदार जोशी व महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचीव किरण साळी, मंजुश्री संदीप खर्डेकर आणि अ‍ॅड अर्चिता मंदार जोशी यांच्यासह आदी उपस्थित होते.


’जरा चुकीचे, जरा बरोबर, बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही, या कविते कार्यक्रमांची सुरुवात झाली. टाळ्यांचा कडकडाटाने श्रोत्यांनी दाद दिली.
’दमलेल्या बाबां’ची कहाणी सांगत संदीप खरे यांच्या कवितांना सलील कुलकर्णी यांनी स्वरसाज चढवत रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला. ’अग्गोबाई ढग्गोबाई’ या कवितांवर लहान मुला-मुलींनी ठेका धरत उपस्थित पालकांचे लक्ष वेधले. लहाण मुलांच्या चेहर्‍यावर खरा आनंद दडलेला असतो. त्यांच्या समोर गायले की लगेच आम्ही सादर केलेले गीत कीती चांगले चांगले झाले हे त्यांच्यावरुन आम्हाला कळते, असेही यावेळी सलील कुलकर्णी यांनी सांगितले.
कोण कोण वर्गात हात करा वर, एक होता मासा लाल झाला त्याचा घसा डॉक्टर म्हणाले कोरड्या पाण्यात जाऊन बसा, मी पप्पाचा फोन केला राव, आजोबा म्हणात खंडेराव, कृष्ण हे बालगीते सादर करुन लहाणग्याबरोबरच मोठ्यांचे मने या गायकांनी जिंकली.
मन तळ्यात मन मळ्यात, नसतेस जेव्हा घरी तु, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, जपत किनारा सोडून नामंजूर या कविता सादर करत कवी संदीप कुलकर्णी आणि गायक सलील कुलकर्णी यांनी रसिकावर मोहिनी घातली. त्याचबरोबर रेकॉडिंगच्यावेळी अनेक घडलेले किस्से सांगितले. उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला.
गायक शुंभकर कुलकर्णी यानेदेखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्याने ‘ऐकटी ऐकटी घाबरलीस ना’ हे गीत सादर करुन श्रोत्यांची दाद मिळविली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सागरा प्राणतळमळला या गीताने कार्यक्रमांची सांगता केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले. तर अ‍ॅड. मंदार जोशी यांनी आभार मानले.

See also  हौशी गायक कलाकारांसाठी २०वी पुणे आयडॉल स्पर्धा रंगणार