मुळशी तालुक्यातील पौड येथे तरुणीवर वकिलाकडून विनयभंग अत्याचार; धमकी देत मारहाण केल्याचा आरोप, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : मुळशी तालुक्यातील पौड परिसरात एका वकिलाने त्याच्याच ऑफिसमध्ये काम करत असलेल्या एका तरुणीला मारहाण करत विनयभंग करून तिला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी (वय २०) ही मुळशी तालुक्यातील येथील रहिवासी असून ती वकिलाच्या कार्यालयात नोकरी करत होती. ६ मार्च २०२६ रोजी तिने पेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे आरोपी रितेश सुरेश ढोरे (रा. पौड, ता. मुळशी, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तिची आणि आरोपीची काही काळापासून ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला बोलावून घेतले तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे पीडित तरुणी घाबरलेल्या अवस्थेत होती. अखेर पौड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. कामानिमित्त तरुणीला गाडीत बसवून मुळशीच्या दिशेने आरोपी गेला व इतर मुलांशी बोलत असल्याचा तरुणीला जाब विचारला यावरून त्याने स्टीलची बाटली तिच्या डोक्यात मारली व तिचे कपडे फाडले. तसेच धरणामध्ये उडी मारून जीव देण्याची धमकी देऊ लागला. यावरून तरुणीने घरी फोन लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तरुणीला कोळवण रोडवर सोडून पळ काढला.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७४, ११८(१), ११५, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार ही घटना ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पौड परिसरात घडली. पोलिसांनी फिर्यादीचा जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणाचा तपास पौड पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी करत असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल अनीता सोपन रावळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

See also  बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्राचे लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते