धमकावल्याप्रकरणी नगरसेवक बाबुराव चांदेरे विरोधात अदखलपात्र गुन्हा

बाणेर : बाणेर येथील बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सचिन चाकणकर (वय -46)  राहणार बाणेर चाकणकर मळा या नागरिकाला पोलीस स्टेशन बाहेर धमकी दिल्याचे धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी बाणेर पोलीस स्टेशन येथे चांदेरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

सचिन रघुनाथ चाकणकर हे बाणेर पोलीस स्टेशन येथे बांधकामाच्या वादावरून तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. तक्रारदार राहत असलेल्या जागेवरून त्यांच्या चुलत भावांशी त्यांचा वाद असल्यामुळे पुणे महानगरपालिकेने वादग्रस्त जागेवर सुरू असलेल्या बांधकामाला वर्क स्टॉप ऑर्डर दिली होती. तरीही बांधकाम सुरू असल्याने तक्रारदार त्यांच्या कुटुंबांसह बाणेर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

दरम्यान बाबुराव चांदेरे त्या ठिकाणी आले व त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर तक्रारदारांना शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली. व तुझे घर पाडून टाकतो असे म्हणाले असल्याचे बाणेर पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

See also  महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान - अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार