चांदे येथील ग्राम सचिवालय इमारत व मॉडेल स्कूल लोकार्पण समारंभ संपन्न

चांदणे : चांदे (ता. मुळशी) येथील ग्राम  सचिवालय इमारत व मॉडेल स्कूल लोकार्पण सोहळा संपन्न झाला.आमदार शंकरभाऊ मांडेकर आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.विरधवल जगदाळे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला.

मॉडेल स्कूलमुळे  गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी पोषक वातावरण आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळतील. तर ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून गावाच्या कारभाराला अधिक गतिमानता आणि सुसूत्रता येईल.
याप्रसंगी गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, माजी सैनिक आणि पोलीस बांधवांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गजानन पाटील साहेब, उपाध्यक्ष मा.श्री.विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे, मुळशी पंचायत समिती सभापती मंदाताई शेळके , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे , उपसरपंच गणेश मांडेकर , निलेश मांडेकर यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी व चांदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  संपर्क संस्थेच्या बालग्रामला सर्वतोपरी मदत करणार - मा. आ. चंद्रकांतदादा पाटील