बाणेर : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर कोथरूड मतदारसंघाचे सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर यांच्या वतीने बाणेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
या प्रसंगी स्थायी समिती सदस्या मयुरी कोकाटे, औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे, कोथरूड मंडळाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, प्रमोद अण्णा निम्हण, गणेश कळमकर, राहुल कोकाटे ,प्रल्हाद सायकर , उमाताई गाडगीळ, सचिन दळवी, अस्मिता करंदीकर, वंदना सिंग, अनिकेत चांदेरे, निकिता माथाडे, सुभाष भोळ ,विजया चांदोरकर, वैदेही बापट, रोहन कोकाटे, शिवम बालवडकर, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, प्राजक्ता देवस्थळी, मृणालिनी दुबळे, रीना रायकर, जागृती विचारे, श्रेयस जाधववार, सोहम मुरकुटे, कौशल टंगसाळी, कृष्णा शर्मा, महेश सुतार, महेश कुंटुरकर, सचिन पाडाळे ,शकिल सलाटी,विकास कामत, पंकज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
चाकण रक्तपेढीच्या वतीने शिबिरात रक्तसंकलन करण्यात आले. सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
















