“मिसिंग लिंक की मिसिंग प्रशासन?” बालेवाडी-वाकड रस्ता वर्षानुवर्षे रखडला

बालेवाडी : पुणे महानगरपालिकेच्या मिसिंग लिंक या महत्त्वकांक्षी प्रकल्प अंतर्गत येत असलेला दोन शहरांना जोडणारा बालेवाडी येथील वाकड बालेवाडी ब्रिज येथील रस्ता गेले अनेक वर्ष आश्वासनांच्या आधारावर राहिला आहे.

विशेष बाब म्हणजे कोट्यावधी रुपयांचा निधी पालिका व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध असताना देखील हा रस्ता पूर्ण होत नाही. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यामध्ये जमीन जात असलेल्या काही नागरिकांशी अद्याप पर्यंत संपर्क केला नसल्याची बाब समोर येत आहे.

जमीन रस्त्यासाठी जात असलेल्या नागरिकांपर्यंत पुणे महानगरपालिका अधिकारी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अद्याप पर्यंत संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नसल्याने मिसिंग लिंक चे स्वप्न कसे सत्यात उतरणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील आमदार शंकर जगताप यांनी देखील या परिसरात आग्रही भूमिका घेत पाहणी केली होती. परंतु पुणे महानगरपालिकेमधील अधिकारी मात्र हा रस्ता न्यायालयाचे आदेश मिळून देखील पूर्ण करण्यासाठी आग्रही नसल्याचे त्यांच्या उदासीन कारभारावरून दिसत आहे.

शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता बांधण्यात आलेला पूल यामुळे शेतकऱ्यांचे अनेक वर्ष नुकसान झाले आहे तसेच पुलाची जागा बदलल्यामुळे देखील त्रास सहन करावा लागला आहे असे असताना देखील शेतकरी जागा देण्यास तयार असताना त्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून पालिका प्रशासन पुढाकार घेत नसल्याची बाब वारंवार समोर येत आहे.कॅबिनेट मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बाणेर बालेवाडी पाषाण परिसरामध्ये महत्त्वकांक्षी मिसिंग लींक प्रकल्प सुरू केला परंतु अद्याप पर्यंत महानगरपालिकेला एकही लिंक योग्यरित्या पूर्ण करता आलेली नाही. पालिकेच्या उदासीन दृष्टिकोनामुळे व पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी फक्त कार्यालयात घेतलेल्या बैठकांमुळे रस्त्यावरील परिस्थिती योग्यरीत्या मांडली जात नसल्यामुळे मिसिंग लिंक प्रकल्प अपूर्ण राहिल्या आहेत.

कॅबिनेट मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बाणेर बालेवाडी पाषाण परिसरामध्ये महत्त्वकांक्षी मिसिंग लींक प्रकल्प सुरू केला परंतु अद्याप पर्यंत महानगरपालिकेला एकही लिंक योग्यरित्या पूर्ण करता आलेली नाही. पालिकेच्या उदासीन दृष्टिकोनामुळे व पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी फक्त कार्यालयात घेतलेल्या बैठकांमुळे रस्त्यावरील परिस्थिती योग्यरीत्या मांडली जात नसल्यामुळे मिसिंग लिंक प्रकल्प अपूर्ण राहिल्या आहेत.

See also  आयटी पार्क हिंजवडी मधील विविध समस्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी, रस्ते अडवणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा केल्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालिकेत आवाज उठवावा व टाईम बॉण्ड कार्यक्रम आखण्यात यावा अशी मागणी बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.