अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहरातर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

डेक्कन, पुणे – स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे शहराने डेक्कन येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्वराज्याच्या रक्षणासाठी अदम्य धैर्य, अपराजित रणनिती आणि तेजस्वी बुद्धिमत्तेचा परिपूर्ण उदाहरण ठरलेले छत्रपती संभाजी महाराज, प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्यनिष्ठा अबाधित ठेवत, औरंगजेबाच्या आक्रमणासमोर न झुकता स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि पराक्रमाची परंपरा जपत होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तेजस्वी बुद्धिमत्ता आणि रणनितीच्या गौरवाला सलाम केला.

कार्यक्रमात शहराचे अध्यक्ष युवराज दिसले, सरचिटणीस गणेश मापारी, महिला कार्याध्यक्ष मिलन पवार, उपाध्यक्ष कमिनी मेमाणे, तसेच तानाजी शिरोळे, प्रांजल काळे, जितेंद्र कोंढरे, रागिनी अमराळे, अश्विनी शिंदे, रविंद्र मेमाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

See also  'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४'चे पुण्यात आयोजन