राजकोट किल्ल्यावरील घटनेचा पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून निषेध

पुणे : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने या सरकारचा भ्रष्ट कारभार समोर आला आहे. याविरोधात पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज संध्याकाळी डेक्कन गुड लक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुध अभिषेक घालून या सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले.

या मोदी सरकार व शिंदे फडणवीस सरकार कडून सतत छत्रपती घराण्याचा अवमान करण्यात येत आहे, हेच वारंवार घडत राहिल्यास या सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही असा इशारा पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. सौरभ अमराळे यांनी दिला.

या आंदोलन दरम्यान पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. सौरभ अमराळे, प्रदेश पदाधिकारी प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, आनंद दुबे, विक्रम धर्मावत, गणेश उबाळे, वाहिद निलगिर, आशिष व्यवहारे, विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश वीरकर, अजित ढोकळे आशुतोष जाधवराव, शहर पदाधिकारी विवेन केदारी, सद्दाम शेख, कुणाल काळे, ऋतिक शिंदे पुणमित तिवारी, सुजित गोसावी,प्रणव खरात, ऍड. सुरज मादेवाड जमादार, ऋषी सणस यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पतित पावन संघटनेच्या वतीने पुणे मनपा क्रीडा अधिकारी कार्यालय समोर निदर्शने