हिंजवडी आयटी कंपन्यांमधील कामगार शोषण, वेतन थकबाकी आणि फ्रेशर्स फसवणुकीविरोधात आम आदमी पार्टीची मोहीम

पुणे : देशातील प्रमुख आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील अनेक आयटी कंपन्यांविरोधात गंभीर तक्रारी समोर येत आहेत. कामगारांना महिनोन्महिने वेतन न देणे, नोकरीच्या नावाखाली सिक्युरिटी डिपॉझिट उकळणे, इंटर्न्स आणि फ्रेशर्सकडून विनामूल्य काम करून घेणे तसेच अचानक कार्यालय बंद करून कर्मचारी व युवकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी पुणे शहर कामगार आघाडीने संबंधित कंपन्यांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली असून पीडित कर्मचारी, इंटर्न्स आणि फ्रेशर्सना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष उभारण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी पुणे शहर कामगार आघाडीने संबंधित कंपन्यांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली असून पीडित कर्मचारी, इंटर्न्स आणि फ्रेशर्सना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष उभारण्याचा इशारा दिला आहे.

आम आदमी पार्टी पुणे शहर महासचिव श्री. सुभाष करांडे यांनी प्रशासन, कामगार विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणांची तात्काळ चौकशी करून दोषी कंपन्या व व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

“युवकांच्या करिअरशी आणि स्वप्नांशी खेळणाऱ्या कंपन्यांना कोणतीही माफी नाही. कामगारांचे शोषण करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल,” असे श्री. सुभाष करांडे यांनी स्पष्ट केले.

पीडित कर्मचारी, इंटर्न्स आणि फ्रेशर्सनी नियुक्तीपत्र, वेतन स्लिप, बँक स्टेटमेंट, चॅट, ई-मेल किंवा इतर पुराव्यांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाइन: 7373121290 / 8308339201

See also  "सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल, नाहीतर १०० कोटी द्यावे लागेल" -अनिल परब