औंध : महाविद्यालय हे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम करते. माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यातून विचारांचे आदानप्रदान होते असे डॉ. राजेंद्र रासकर यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथील माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य अरुण आंधळे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष विकास रानवडे, केदार कदम, डॉ सविता पाटील, डॉ प्रभंजन चव्हाण, डॉ बाळासाहेब कल्हापुरे, सोनम खोंड, सारिका तांबिडकर आदी उपस्थित होते.
युवा भारत केसरी विराज रानवडे यांचा माजी विद्यार्थी संघटना व महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य अरुण आंधळे, विकास रानवडे, केदार कदम, माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.