सिंहगड रोड परिसरातील एकता नगरी येथील पूरजन्य भागातील विविध कामांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून पाहणी

पुणे : सिंहगड रोड परिसरातील एकता नगरी येथील पूरजन्य भागातील विविध कामांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
या पाहणीदरम्यान नाल्याच्या कडेला सुरू असलेल्या संरक्षक सीमाभिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नदीकाठी गतवर्षीप्रमाणे मातीचा तात्पुरता बंधारा उभारण्याबाबत क्षेत्रीय कार्यालय आणि प्रकल्प विभाग यांनी समन्वय साधून कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी लाईनची स्वच्छता आणि सफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे,  शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता पथ विभाग श्री. राजेश बनकर, मुख्य अभियंता प्रकल्प विभाग श्री. दिनकर गोजारे, मुख्य अभियंता पाणी पुरवठा विभाग श्री. नंदकिशोर जगताप, उपायुक्त दक्षता विभाग श्री. प्रसाद काटकर, मुख्य अभियंता विद्युत विभाग श्रीमती मनीषा शेकटकर,  उपायुक्त परिमंडळ क्रमांक ३ श्री. विजयकुमार थोरात, उपायुक्त घनकचरा विभाग श्री. संतोष वारुळे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क विभाग श्री. तुषार बाबर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनी परिसरातील पूरस्थितीबाबत विविध समस्या मांडल्या असून प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

See also  सिद्धार्थ शिरोळे यांना औंध भागातील युवकांचा वाढता पाठिंबा, विविध मंडळातील कार्यकर्त्यांशी,  नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी