प्रभाग ७ की ८? कचरा संकलनाच्या जबाबदारीवरून गोंधळ; सपना छाजेड यांनी उपायुक्तांना दिले निवेदन

पुणे :  प्रभाग क्रमांक ८ मधील कस्तुरबा वसाहत, जगदीश नगर, रचना ब्लॉसम, रचना सोसायटी आणि परिसरातील नागरिकांना कचरा संकलनाच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असून या प्रश्नाबाबत कार्यक्षम नगरसेविका तथा पुणे महानगरपालिका शहर सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा सौ. सपना आनंद छाजेड यांनी परिमंडळ २ चे उपायुक्त अविनाश सपकाळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

संबंधित भागांचा समावेश प्रभाग क्रमांक ८ मध्ये करण्यात आला असला तरी प्रभाग ७ आणि ८ यांच्या सीमावर्ती भागात कचरा संकलनाची जबाबदारी कोणाकडे याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी नियमित कचरा उचलला जात नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढली असून दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत

या पार्श्वभूमीवर सौ. सपना छाजेड यांनी प्रशासनाकडे कचरा संकलनाची जबाबदारी स्पष्टपणे निश्चित करण्याची मागणी केली. तसेच नियमित घरपोच कचरा संकलन सुरू करणे, आवश्यक ठिकाणी कचरा कंटेनर उपलब्ध करून देणे, अतिरिक्त मनुष्यबळ व वाहनांची नियुक्ती करणे आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.
सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या प्रसंगी भाजपा उत्तर मंडळाचे अध्यक्ष आनंदजी छाजेड हे देखील उपस्थित होते.

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सौ. सपना छाजेड यांच्या या पुढाकाराचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

See also  ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून बाणेरकरांची दिवाळी गोड!नाममात्र दरात फराळ उपलब्ध उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद