बालेवाडीत मोठी कारवाई; ममता चौकात कारमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त

पुणे, प्रतिनिधी : बालेवाडी येथील ममता चौक परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईहून आलेल्या एका चारचाकी वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नार्कोटिक्स विभागाने सापळा रचत छापा टाकला.

कारवाईदरम्यान संबंधित वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात संशयित अमली पदार्थांचा साठा आढळून आला. त्यानंतर तो साठा जप्त करण्यात आला असून वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा प्रकार, त्याची किंमत, वजन तसेच या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण याबाबत नार्कोटिक्स विभागाकडून सखोल तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे बालेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची अधिकृत माहिती तपास यंत्रणेकडून लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

See also  पुण्यात ‘शहर परिवर्तन कक्ष’ स्थापन; सर्व विभागांमध्ये समन्वयातून विकासावर भर