पर्यावरण जनजागृती सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या रॅलीतून विद्यार्थ्यांचा हरित संदेश!

धानोरी : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, भैरवनगर, धानोरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भव्य पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीत विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा”, “पाणी वाचवा, जीवन वाचवा”, “स्वच्छ पर्यावरण, सुंदर भविष्य” आणि “प्लास्टिकमुक्त भारत” अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे आकर्षक फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या रॅलीत संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक पाटील, उपाध्यक्ष श्री. अनुराग पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय श्रीवास्तव, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व संस्थापिका सौ. विद्या पाटील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले.

यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन, पाणी बचत, प्लास्टिकचा कमी वापर आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवला.

भविष्यातही पर्यावरण संवर्धनासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

See also  अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार; सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर कराशेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे