पुणे : श्री. राष्ट्रसंत श्रीपादबाबा रामदासबाबा पालखी सोहळा संस्थान तसेच ह. भ.प. श्री तुकाराम महाराज नेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज टाळ पालखी सोहळ्यात टाळगाव चिखली–देहू–पंढरपूर या पवित्र मार्गावरील रथ ओढण्याचा मान श्री. गणेश नारायण भुजबळ यांच्या ‘देवा’ आणि ‘शिवा’ या नंदी बैलांना मिळाला.
वारकरी परंपरेतील हा मान अत्यंत सन्मानाचा मानला जातो. या सेवेची संधी मिळाल्याबद्दल श्री. गणेश नारायण भुजबळ यांनी श्री. राष्ट्रसंत श्रीपादबाबा रामदासबाबा पालखी सोहळा संस्थान तसेच ह. भ.प. श्री तुकाराम महाराज नेवाळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
















