सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन

सुस : सुस परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत सुसचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चा, कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चांदेरे यांनी वाहतूक पोलीस विभाग, बावधन यांना निवेदन दिले.

सुस येथील शिवबा चौक व तापकीर वस्ती येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सकाळी व सायंकाळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी किमान दोन वाहतूक पोलीस अधिकारी व वाहतूक वॉर्डन नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली.

सुस परिसरात वाढती लोकसंख्या, वाढते वाहनांचे प्रमाण आणि अपुरी वाहतूक यंत्रणा यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका यांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा व सोयीचा विचार करून तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी अनिकेत चांदेरे यांनी निवेदनाद्वारे केली.

See also  राज्यात सुमारे २२ हजार बंद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ