पौड : मुळशी पॅटर्न 2 ला मुळशीकरांचा विरोध मुळशी पॅटर्न या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुळशी तालुक्यातील वेदल या सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या नावावरून मुळशी मध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
मुळशी पॅटर्न 2 या नावामुळे मुळशी तालुक्याची ओळख हे गुन्हेगारी तालुका अशी निर्माण झाली तालुक्याची नकारात्मक भूमिका तयार होत असल्याचा मुळशीकारांनी केला आहे. पौड येथील सेनापती बापट सभागृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी व तालुक्यातील नागरिकांनी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व विविध संघटांनी कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार केला. प्रत्येक ग्रामपंचायतच्या मासिक सभा आणि ग्रामसभा मुळशी पॅटर्न 2 या सिनेमा उल्ले का विरोधात ठराव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. व महिला शेतकरी युवक आणि धार्मिक संघटना सहभागी झाले.
आता मुळशीतील प्रतिष्ठेसाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका मुळशीकरांनी घेतली आहे. त्यामुळे मुळशी पॅटर्न 2 च्या नावामुळे सुरू झालेला वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या विरोधात मुळशीकारांनी आव्हान केला आहे.
















