गृहनिर्माण संस्थांसाठी औंध येथे मार्गदर्शन मेळावा

औंध : पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ आणि माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संयुक्त विद्यमाने औंध येथील हॉटेल करोल बाग येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


या मेळाव्यात जिल्हा उपनिबंधक श्री. संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत सोसायटी व्यवस्थापन, सभासद आणि पदाधिकारी यातील वाद, भांडणे, दैनंदीन कामकाजात येणाऱ्या अडचणी, नॉमिनेशन, पुनर्विकास आणि स्वयंपुनर्विकास अशा अनेकविध विषयांवर उपस्थित सभासदांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील उत्तरे दिली.


त्यानंतर पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन यांनी महासंघ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून महासंघाच्या वाटचालीची माहिती सदस्यांना दिली. ॲड. डहाके यांनी मानीव अभिहस्तांतरण याचे महत्व विशद केले. ॲड. मृदगंधा जोशी यांनी सभासदत्व आणि त्याचे विविध प्रकार, पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका याविषयी मार्गदर्शन केले. सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना श्री. सुहास पटवर्धन आणि श्री. राउत साहेब यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाच्या औंध बाणेर शाखेच्या अध्यक्षा सौ. प्रिती शिरोडे यांनी केले तर आयोजक श्री. सनी निम्हण यांनी आभार मानले.

See also  चांदणी चौकातील उद्घाटनाच्या निमित्ताने महामार्ग लगत असलेले रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत