धानोरी : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक पाटील सर यांच्या शुभहस्ते झाले. ध्वजपूजन संस्था उपाध्यक्ष अनुराग पाटील, विद्या पाटील (मुख्याध्यापिका माध्यमिक), विजय श्रीवास्तव (मुख्याध्यापक प्राथमिक), अनामिका कुलकर्णी (मुख्याध्यापिका डॉ. आंबेडकर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल) व विशाल वाघमारे (प्राचार्य डॉ. आंबेडकर सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल अँड कॉलेज) यांच्याहस्ते झाले. शाळेत देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमांची आखणी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत ‘जन गण मन’, तसेच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्यगीत या गीतांनी झाली. मराठी माध्यमातील विद्यार्थिनींकडून ध्वजगीत सादर करण्यात आले , शाळेच्या वतीने ‘तंबाखू मुक्त, असाक्षरता, कॉपी मुक्त अभियान’ यांसारख्या उपक्रमांची शपथ घेण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांकडून ‘जय हो’, ‘देश रंगीला रंगीला’, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा’ यांसारखी देशभक्तीपर गीते, तसेच विविध वर्गांच्या विद्यार्थ्यांचे म्युझिकल ड्रिल, देशभक्तीपर गीतांवर नृत्य आणि समूह सादरीकरणे झाली. मराठी माध्यम प्राथमिकच्या विद्यार्थ्याकडून संगीतावर कवायतीचे सादरीकरण करण्यात आले तसेच तिरंगा सप्ताहात आयोजित स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांकडून ‘जय हो’, ‘देश रंगीला रंगीला’, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा’ यांसारखी देशभक्तीपर गीते, तसेच विविध वर्गांच्या विद्यार्थ्यांचे म्युझिकल ड्रिल, देशभक्तीपर गीतांवर नृत्य आणि समूह सादरीकरणे झाली. मराठी माध्यम प्राथमिकच्या विद्यार्थ्याकडून संगीतावर कवायतीचे सादरीकरण करण्यात आले तसेच तिरंगा सप्ताहात आयोजित स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी परिश्रम घेतले.
यावेळी मानसी पलांडे, तृप्ती कांबळे, योगेश बिंदगे, सविता इमडे, अर्चना बनछोड, सुखदा वाळंज, सोमनाथ हुचगोळ, शारदा पाटोळे, मारुती पाटील, मनीषा चिंचणे, अंबादास कांबळे, रूपाली पवार, प्रिया शेलार, ममता चौधरी, सुप्रिया भारती, रमाताई डंबारे, गौतम बोरकडे व मुकेश विधाते (मराठी माध्यम) व शुभांगी काळगुडे, यमुना गड्डम, वैशाली सुतार, अनिता, गायकवाड, रुबीमोल वरुघीस, वैशाली पानपाटील, मंजुषा सिंग, प्रतीक्षा मुळे, विदुला सूर्यवंशी, अश्रफ करणी, रिना सोनावणे, वैशाली बनसोडे, माधुरी प्रजापती, अपर्णा हजारे व सुजाता चोपडे, मोनालिसा भालेराव व सुरज ब्रह्मराक्षे (इंग्रजी माध्यम) आणि उमा बजरंग भोसले, उद्धव रघुनाथ चव्हाण, रफिक पठाण, गोविंद ज्ञानोबा आंदे, राधिका जोशी, संतोष पगारे, देविदास राठोड, श्री. पाटोळे, सौ. संगीता कांबळे (पालक) हे सर्व शिक्षक कर्मचारी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सौ. अनामिका कुलकर्णी यांनी केले आणि शाळेच्या वतीने सर्व उपस्थित विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक यांचेही विशेष आभार मानण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी परिश्रम घेतले.