पुणे बार असोसिएशन तर्फे व्याख्यान व सन्मान सोहळ्याचे आयोजन .

पुणे ‌: पुणे जिल्ह्यातील वकीलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन तर्फे ॲड.पांडुरंग थोरवे (मा. अध्यक्ष पुणे बार असोसिएशन) यांचे मोजणी संदर्भातील महत्त्वाची परिपत्रके व कागदपत्रे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स सोसायटी यांच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आला. या प्रसंगी पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश शाम चांडक साहेबपुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पांडुरंग थोरवे यांनी मोजणीसंदर्भात सिंधु संस्कृती पासून आजपर्यंतचा मोजणीच्या सर्व इतिहासाची माहिती दिली. तसेच मोजणी संदर्भातील गट बुक, आकारफोड, फाळणी, टिपण, स्कीम, अशा विविध कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली. तसेच मोजणी संदर्भातील १९२७ पासून आजतागायत मधील महत्त्वाच्या जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य, उपसंचालक व जिल्हा अधिक्षक यांच्या परिपत्रकांची माहिती दिली.

या प्रसंगी बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.सी. चांडक यांनी पुणे बार असोसिएशन च्या लेक्चर सिरिजला शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच दि पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स सोसायटी यांच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. गोरक्षनाथ काळे सर . महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे शिस्त पालन समितीचे माजी चेअरमन ज्येष्ठ विधिज्ञ तुषार कोठावळे सर , तसेच पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.विश्वजीत पाटील,ॲड. जयश्री चौधरी-बीडकर, सचिव ॲड. राहुल कदम, खजिनदार ॲड. समीर बेलदरे, ऑडिटर ॲड.अजय देवकर, तसेच सदस्य ॲड.रेश्मा चौधरी,ॲड. श्रद्धा जगताप, ॲड.वर्षा साबळे,ॲड.प्रमोद नढे, ॲड. अमोल वडगणे, ॲड. संजय खैरे, ॲड.राहुल प्रभुणे, ॲड.सचिन माने,ॲड.ऋषीकेश कोळपकर,ॲड.चंद्रसेन कुमकर,व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. केतन कोठावळे यांनी केले.तसेच सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनचे सचिव ॲड.गंधर्व कवडे यांनी केले.तसेच आभार ॲड.मयुरी कासट यांनी मानले.

See also  आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे