रविंद्र महाजनी यांचे निधन सर्वांसाठी वेदनादायी ;पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली

पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील राजबिंडा व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या रविंद्र महाजनी यांचे जाणे सर्वांनाच चटका लावणारे आहे. ‘देवता’ या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘खेळ कुणाला दैवाचा कळला?’ या ओळींची आज प्रत्यक्षात अनुभूती होत आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. मुंबईचा फौजदार चित्रपटाद्वारे ते प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलेच नाही. देवता चित्रपटात ‘दैवलेख ना कधी कुणा टळला, खेळ कुणाला दैवाचा कळला?’ याचा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात येतो, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील रुबाबदार आणि अष्टपैलू अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. रविंद्रजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केल्या आहेत.

See also  माऊलींच्या अश्वांचे अंकलीहून प्रस्थानवारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या हस्ते अश्वांचे पूजन