पुणे : पुण्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे पुणे शहरातील भाजपाच्या संघटनात्मक ताकदीत आणखी भर पडली आहे.
या तिघांचेही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील त्यांच्या वतीने भाजपा परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वांना सोबत घेऊन पुण्यात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रवेश सोहळ्यास भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने, शहर सरचिटणीस दीपक पोटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सुपेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा नेते प्रकाश तात्या बालवडकर, गणेश कळमकर, लहु बालवडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात पुणे शहरातील विविध भागांमध्ये भाजपाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
















