पुणे पोलिसांची कर्णकर्कश आवाजा विरोधात धडक कारवाई; ‘१ बेस १ टॉप’ नियमाची कडक अंमलबजावणी!

पुणे: शहरात कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणे पोलिसांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक काढणाऱ्या विविध मंडळांची भेट घेऊन पोलीस निरीक्षकांनी त्यांना आवाजाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि अनधिकृत डीजे सिस्टीम लावण्यापासून परावृत्त केले.

या मोहिमेअंतर्गत फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनी) संदिप देशमाने  यांनी कसबा पेठेतील कागदीपुरा येथे एका मंडळाने लावलेले अतिरिक्त स्पीकर्स स्वतः उपस्थित राहून कमी करायला लावले आणि ही कारवाई अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या ‘१ बेस १ TOP’ च्या नियमाची आणि निर्णयाची प्रत्यक्ष जमिनीवर कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

See also  करसंकलन विभागात २९ कोटींचा गैरव्यवहार? आम आदमी पार्टीची चौकशी व कारवाईची मागणी