पाषाण : सुतारवाडीतील सनशाइन प्रिस्कूल मार्फत देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बाणेर पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप व त्यांच्या टीमने उपस्थित राहून सर्व नागरिक पालक व विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गदर्शन केले.
यावेळी एप्पल हॉस्पिटल मार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यावेळी सर्व एप्पल हॉस्पिटल डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. याप्रसंगी धर्मराज सुतार, चिंतामण जाधव, मधुकर निम्हण, गणेश पाटोळे, अविनाश जाधव, संदीप सुतार,भीमराव सुतार, स्वातीताई रणपिसे, स्वातीताई मोरे, सुनीताताई रानवडे, सोनाली सुतार, पल्लवी शिंदे, वृषाली फाले , संगीता गव्हाणे सनशाइन प्री स्कूलचे पालक शिक्षक व विद्यार्थी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन महेश सुतार, अमोल फाले,गणेश मोरे, नकुल गोळे, वेदांग गव्हाणे, तन्मय सुतार, संकेत सुतार, आदित्य, प्रथमेश रणपिसे, अनिल नलावडे, गौरव सुतार, आदेश सुतार, रोहन गव्हाणे, रोहित गव्हाणे, अमर सुतार, दिनेश सुतार ,जीवन सुर्वे, दादा भिसे साई राजे मोरे या सर्वांनी केले. तसेच संजय निम्हण,अशोक दळवी, ऋषिकेश कुलकर्णी, गणेश लगड, यांनी सदिच्छा भेट दिली. मुलांच्या खाऊची व्यवस्था कैलास रणपिसे यांनी केली.
सनशाइन प्री स्कूल मधील विद्यार्थ्यांनी भाषण नृत्यकाम गायन या सर्व गोष्टींनी उपस्थित त्यांची मने जिंकली शाईन प्रिस्कूल चे शिक्षक सूत्रसंचालन पूजा सुतार मॅडम व आभार प्रदर्शन मनिषा पालकर मॅडम तसेच सहकार्य प्राजक्ता सरगुडे मॅडम यांनी केले.