५१ बालेवाडी रेसिडेन्सेसचा हरित ऊर्जेच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा

बालेवाडी : पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला प्रोत्साहन देत पारंपरिक वीज स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने ५१ बालेवाडी रेसिडेन्सेसने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोसायटीमध्ये उभारण्यात आलेल्या ५० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.

सौर ऊर्जेचा वापर वाढवून सोसायटीला अधिक हरित, स्वच्छ आणि शाश्वत बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे भविष्यात वीज खर्चात बचत होण्याबरोबरच पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी विविध विंगमधील सदस्यांनी विशेष योगदान दिले. यामध्ये B विंगमधील सुमित कमल कोले, अमित सिंह चौहान, अविष्कार मोहिते, ओंकार रुद्रवार आणि गिरीश साठे; A विंगमधील शुभांगी धोमसे, तारकेश बालवडकर आणि शुभम बालवडकर; तसेच C विंगमधील आनंद गजभिये, प्रविण हिंगे आणि योगेश शिंदे यांचा समावेश आहे.

५० किलोवॅट क्षमतेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता सुमारे ७५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सोसायटीची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता आणखी वाढणार आहे. ५१ बालेवाडी रेसिडेन्सेसचा हा उपक्रम केवळ वीज निर्मितीपुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने सामूहिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.

See also  पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये - मेधा कुलकर्णी