१०वीच्या परीक्षेत अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूलचा 100 टक्के निकाल
१०० टक्के निकालाची परंपरा सलग 20 व्या वर्षीही..

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १०वीच्या परीक्षेत आंबेगाव बु ||येथील अभिनव अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने १०० टक्के निकालाची परंपरा सलग 20 व्या वर्षीही सातत्याने राखून घवघवीत सुयश संपादन केले. शाळेतील श्रावणी राऊत हिने ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम, अनुष्री पतारे हिने ९५.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर अमेय माळवदे याने ९५.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.३१ विदयार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षi जास्त गुण मिळवले असून १५१ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षi जास्त गुण मिळवले आहेत. अनुष्री पतारे,आनुष्री जाधव,मृणाल शिंदे,या विद्यार्थिनीं म्हणाल्या की,"आम्ही कोणताही कोचिंग क्लास न लावता शाळेत शिकवलेला अभ्यासक्रम,सर्व शिक्षकांनी दिलेल्या टिप्स आणि बोर्ड परीक्षेची करून घेतलेली तयारी यामुळेच आम्ही हे उत्तुंग यश प्राप्त करू शकलो."

शाळेतील सर्व शिक्षकांनी दररोजच्या अभ्यासाबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केल्याने त्याचबरोबर विविध परीक्षांचा सराव घेतल्याने आम्ही उत्तम प्रकारचे गुण मिळवू शकलो असे विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवून १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप ,सेक्रेटरी सुनीता जगताप,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप,समन्वयक डॉक्टर सविता शिंदे,प्राचार्या वर्षा शर्मा,पर्यवेक्षिका धनश्री खरे,यांनी सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

See also  पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे