औंध येथे छ. शिवाजीनगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ  शिरोळे यांचा औंध ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार

औंध : औंध येथे माजी नगरसेविका अर्चना मुसळे आणि ॲड. डॉ. मधुकर मुसळे यांनी औंध गावातील महिलांसाठी महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते या महिला मेळाव्याला महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे पुनश्या नवनिर्वाचित आमदार श्सिद्धार्थ शिरोळे यांचा  ॲड. डॉ. मधुकर मुसळे व माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , पुणेरी पगडी, छत्रपती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती देऊन जाहीर नागरी सत्कार  करण्यात आला.

ह.भ.प. श्री परशुराम रानवडे पाटील यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना शाल श्रीफळ देऊन तर बाबासाहेब मदने, दर्शन सिंग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि  अल्लाउद्दीन पठाण, हरून भाई पठाण, वस्ताद विकास रानवडे यांच्या हस्ते पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मिलिंद कदम,  रोहन कुंभार, श्रीमती शारदा मुसळे, श्रीमती ऋतुजा मुंडे, स्वप्निल सांगळे, अक्षय सांगळे, रोहित मस्के, प्रमोद प्रतापे, प्रशांत ठोसर, रवी मोहोळ, सागर मदने आदी उपस्थित होते.

महिला मेळाव्यामध्ये औंध गाव, डीपी रोड, नागराज रोड, गायकवाड नगर, डॉ. आंबेडकर वसाहत परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच गावातील भजनी मंडळातील महिलांचा देखील यावेळी सत्कार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला.



         

See also  भाजपा कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन