बाणेर : बाणेर-बालेवाडी परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी विनंती करणारे पत्र सोसायट्या आणि रहिवाशांच्या वतीने सादर करण्यासाठी BWF च्या शिष्टमंडळाने आज बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात रमेश रोकडे, दफेदार सिंग, आशिष कोटमकर, वंदना चौधरी, मिलिंद जोशीराव, बाळासाहेब दंडवते आणि के.एन. पीतांबरम यांचा समावेश होता.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यावेळी यांनी BWF च्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, बाणेर पोलिसांनी या विषयावर प्रमुख गणेश मंडळांशी यापूर्वीच चर्चा केली आहे. तसेच, मंडप आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या अति-आवाजामुळे रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास किंवा तणाव सहन करावा लागणार नाही, याची पोलीस काळजी घेतील.















