पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा : रवींद्र चव्हाण; डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रथमच महिला नेतृत्वाला संधी मिळत असून, डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयातून नवा इतिहास घडवण्याची संधी मतदारांना मिळाली आहे. तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर भाजपाने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. पदवीधर आणि शिक्षकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले.

या प्रचार शुभारंभाला भाजपाचे निवडणूक प्रभारी तथा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक सहप्रभारी तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री माधुरी मिसाळ, सहनिवडणूक प्रमुख शरद लाड, डॉ. प्रशम कोल्हे, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महापौर मंजुषा नागपुरे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापभय्या माने, भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, आमदार निरंजन डावखरे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, हेमंत रासने, राहुल कुल, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महापालिकेचे स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विक्रम पावसकर आणि निवेदिता एकबोटे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

See also  देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे स्वागत करण्याजोगे आम आदमी पार्टी