पुणे: बाणेर येथील रिग्रीन एक्सल ईपीएस इंडिया लि. कंपनीच्या पाच संचालकांनी विश्वासघात आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कंपनीने अनेक व्हेंडरचे देखील पैसे दिले नसल्याचे प्रकरण समोर येत आहे. कंपनीची बाणेर व बालेवाडी येथील दोन्ही कार्यालय बंद झाल्यामुळे फसवणूक झालेले कंपनी कर्मचारी या ठिकाणी येऊन जात आहेत.
कंपनीचे संचालक १. संजय श्रीनिवासराव देसाई, २. तुषार वेदू पाटील (रा. वारजे माळवाडी), ३. अलिमुद्दीन अमुद्दीन सय्यद (रा. कोंढवा बुद्रुक), ४. किरण सुधाकर गवळी (रा. कोथरूड), ५. रोकेश लुईस मस्करेन्हस (रा. चिंचवड) यांच्या विरोधात ही तक्रार आहे.१. ५ ते १० वर्षांपासून कर्मचारी: तक्रारदारांनी म्हटले आहे की, आम्ही सर्वजण कंपनीत ५ ते १० वर्षांपासून विविध पदांवर काम करत आहोत. सदर कंपनी नोंदणीकृत असून इथेनॉल उत्पादन प्लांट उभारणीचे प्रोजेक्टचे काम करते. सर्व संचालक हे अॅक्टिव्ह डायरेक्टर असून त्यांनी आम्हाला नियुक्तीपत्रे दिली आहेत.
५ ते १० वर्षांपासून कर्मचारी: तक्रारदारांनी म्हटले आहे की, आम्ही सर्वजण कंपनीत ५ ते १० वर्षांपासून विविध पदांवर काम करत आहोत. सदर कंपनी नोंदणीकृत असून इथेनॉल उत्पादन प्लांट उभारणीचे प्रोजेक्टचे काम करते. सर्व संचालक हे अॅक्टिव्ह डायरेक्टर असून त्यांनी आम्हाला नियुक्तीपत्रे दिली आहेत. आम्ही इमाने इतबारे नोकरी करून कंपनीचा वेळोवेळी फायदा करून दिला. परंतु माहे ऑगस्ट २०२६ ते ऑक्टोबर २०२६ पर्यंतचा पगार, इतर भत्ते आणि दिवाळी बोनस संचालकांनी जाणूनबुजून दिला नाही. ऑगस्ट २०२६ पासून हळूहळू काम कमी करण्यात आले. पगाराची मागणी केली असता “थकीत रक्कमेचे पगार व भत्ते देऊ” असे भूलथापा देऊन २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत काम करून घेतले. दिनांक २९/१०/२०२६ रोजी सर्व कर्मचारी सकाळी कामावर गेल्यानंतर सर्व संचालक दुपारी ०१.०० च्या सुमारास आले आणि “काम करू नका” असे सांगून कंपनीच्या बाहेर काढले. कारण विचारले असता टाळाटाळ आणि उडवाउडवीची उत्तरे दिली.
कंपनी कायद्यानुसार कामावरून काढण्यापूर्वी तीन महिने अगोदर नोटीस देणे बंधनकारक असताना कोणतीही नोटीस न देता, कोणतेही कारण न देता विनाकारण काढून टाकले आणि याबाबत कंपनी रजिस्ट्रारकडे नोंदही केली नाही. त्यानंतर “तुम्हाला कामावर परत कधी यायचे आहे याबाबत पत्रव्यवहार, मेल आणि फोनद्वारे कळवू” असे सांगितले. दोन दिवस वाट पाहून कर्मचाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे मोबाईल बंद, कंपनीला टाळे लावलेले आणि ते राहत्या घरीही मिळून आले नाहीत.
१५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप:
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, थकीत पगाराची रक्कम अंदाजे दरमहा रु. ३,५०,००,०००/- (तीन कोटी) प्रमाणे तीन महिन्याचे अंदाजे रु. १०,५०,००,०००/- (दहा कोटी पन्नास लाख) आणि दिवाळी बोनस व साईट अलाउंसचे अंदाजे रु. ४,३२,००,०००/- (चार कोटी बत्तीस लाख) इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक करून अपहार करण्यात आला आहे.याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार अधिक तपास पोलीस विभागाकडून सुरू आहे.
कंपनीचे संचालक शेकडो कोटींचा घोटाळा करून परदेशात गेले असल्याचे सांगितले जात आहे. याचा तपास करण्यात यावा तसेच संचालकांना ताब्यात घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.















