बाणेर : बाणेर येथील मुरकुटे गार्डन येथे नगरसेविका मयुरी कोकाटे आणि राहुल कोकाटे यांच्या वतीने ‘सुर संध्या’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिवाळी संध्या
सुप्रसिद्ध पार्श्वगायक ऋषिकेश रानडे व शरयु दाते यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाजात या संगीत मैफलीमध्ये जुन्या आणि नव्या काळातील लोकप्रिय, बहारदार गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सुरेल गाणी, संगीताची रंगत आणि सांस्कृतिक वातावरणामुळे उपस्थित रसिकांना एक अविस्मरणीय संगीतानुभव मिळाला.
या कार्यक्रमाला भाजपा सोशल मीडिया प्रमुख श्वेता शालिनी, स्थायी समिती सदस्य तथा नगरसेविका मयुरी कोकाटे, राहुल कोकाटे, माजी पोलीस अधिकारी अजय कदम, संजय वाघुळदे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बाणेर-बालेवाडी परिसरातील विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संगीताच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात सांस्कृतिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.

















