हजारो पुणेकर धावले जोशात अन् उत्साहात; नशामुक्त युवा भारताचा दिला संदेश! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनुपस्थितीत

पुणे : पुण्याच्या रस्त्यांवर आज उत्साहाचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला! हजारो धावपटूंचा सळसळता उत्साह, तरुणाईचा प्रचंड जोश आणि नशामुक्त युवा भारताचा बुलंद संकल्प अशा वातावरणात ‘राष्ट्रीय एकता दौड’ ही मॅरेथॉन मोठ्या दिमाखात पार पडली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते परंतु ते अनुपस्थित राहिले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.

या भव्य मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंसह देशाच्या विविध भागांतून आलेल्या धावपटूंनी सहभाग घेतला. पुणेकरांनीही या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. तब्बल ४० हजारांच्या आसपास धावपटूंनी नोंदणी केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली… तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मता, निरोगी जीवनशैली आणि नशामुक्तीचा संदेश दिला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून या ऐतिहासिक एकता दौडीचे आयोजन करण्यात आले होते.एक भारत, श्रेष्ठ भारत आणि नशामुक्त युवा भारताचा संकल्प घेऊन पुणेकरांनी आज केवळ मॅरेथॉनमध्ये धाव घेतली नाही, तर एका निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त भारताच्या दिशेने एकजुटीने पाऊल टाकले! पुणेकरांचा हा अभूतपूर्व उत्साह, हजारो धावपटूंचा सहभाग आणि नशामुक्तीचा बुलंद संदेश यामुळे पुण्याची ही राष्ट्रीय एकता दौड लक्षवेधी ठरली!

एक भारत, श्रेष्ठ भारत आणि नशामुक्त युवा भारताचा संकल्प घेऊन पुणेकरांनी आज केवळ मॅरेथॉनमध्ये धाव घेतली नाही, तर एका निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त भारताच्या दिशेने एकजुटीने पाऊल टाकले! पुणेकरांचा हा अभूतपूर्व उत्साह, हजारो धावपटूंचा सहभाग आणि नशामुक्तीचा बुलंद संदेश यामुळे पुण्याची ही राष्ट्रीय एकता दौड लक्षवेधी ठरली!

See also  महाळुंगेतील अंगणवाडी सेविकांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान