शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा व मुळशी विभागातील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपजिल्हाप्रमुख दशरथ जाधव, अनेक तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अशा असंख्य पदाधिकारी व हजारो शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व माजी मंत्री व उपनेते विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपजिल्हाप्रमुख दशरथ जाधव, पुणे युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष तोंडे, मुळशी विभागाचे विद्यमान अध्यक्ष व उप तालुकाप्रमुख दीपक आबा करंजवणे, मुळशी तालुका उपसंघटक विठ्ठल रानवडे, मुळशी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष बाबासाहेब साखरे, पुणे युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल पवार, भोर उपतालुकाप्रमुख गणेश निगडे, भोर उपतालुकाप्रमुख सचिन चुनाडे, कुंभार टेकडी शाखाप्रमुख अजय बारंगळे, भोर विभागप्रमुख गणेश नाचंगी, भोर विभागप्रमुख आकाश कोठावळे, मुळशी तालुका व्यापारी असोसिएशन अध्यक्ष राजाभाऊ देशपांडे, मुळशी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष शैलेश पांढरे, सुस तालुका शाखाप्रमुख वसंत नाना चांदेरे, जांबेगावचे उपसरपंच अंकुश गायकवाड, नानेगाव सरपंच सौ.सारिका भिंताडे, ज्योतिबा पाडळे, प्रकाश साबळे, विठ्ठल मोहिते, मनोज टेमघरे, हर्षद गायकवाड, कमल कोंढाळकर, राहुल तापकीर, गणपत लोहिरे, संजय ववले, अपूर्वा निकाळजे, कावेरी सुतार, गणेश साळुंखे, नारायण चांदेरे, सौ.नलिनी ससार, सौ.मीरा देवकर, सुभाष शेडगे, सागर शेडगे, वासुदेव गायकवाड, संदीप मत्रे, रवी लोयरे, गणपत लोयरे, महादेव भोते विक्रम शिंदे, गणेश खुटवड, संभाजी गायकवाड, विठ्ठल बानेकर, अंकुश साठे, बाळासाहेब जाधव जांबे, महादेव पारखी मान, दत्ता दाभाडे दखने, भूपेंद्र गोळे पिरंगुट, तुकाराम वाकणकर मुगावडे, भगवान तापकीर मुलखेड, राजाभाऊ देवकर घोटवडे, शुभम पारखी मान, पांडुरंग हलावले यांचा समावेश होता.

यावेळी माजी मंत्री व उपनेते विजयबापू शिवतारे, युवासेना सचिव किरण साळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे उपस्थित होते.

See also  भव्य स्क्रीनच्या माध्यमातून मनोज जरंगे पाटील यांच्या जालना येथील भाषणाचे बाणेर येथे प्रक्षेपण