पुणे महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई

पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक जागा, पदपथ व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील विविध भागांमध्ये दैनंदिन अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही करण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत धनकवडी, औंध, घोले रोड, कोंढवा-उंड्री, बिबवेवाडी, नगर रोड, वानवडी आणि हडपसर या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

शहरातील सार्वजनिक जागा, पदपथ आणि रस्ते नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ वापरासाठी अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ही कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे.

See also  सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस