मोरेश्वर बालवडकर यांच्या पाठपुराव्याला यश; बालेवाडी-बाणेरमधील खड्डेमय रस्त्यांची प्रशासनाकडून पाहणी, तातडीने दुरुस्तीचे आश्वासन

पुणे : बालेवाडी-बाणेर परिसरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते श्री. मोरेश्वर बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेचे औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. विजय नायकल यांच्याकडे तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याची मागणी केली होती.

या मागणीची तात्काळ दखल घेत सहाय्यक आयुक्त श्री. विजय नायकल साहेब, लांडे साहेब यांनी आज बालेवाडी-बाणेर परिसराला प्रत्यक्ष भेट देत रस्त्यांची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन संबंधित रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

रस्त्यांची दुरुस्ती तातडीने व्हावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

See also  केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांचा मोफत इलाज;‘दिवाळी विथ अ पर्पज’उपक्रमाचे यंदा 30 वे वर्ष