बालेवाडी : खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रल्हाद सायकर यांच्या वतीने दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हा धनादेश प्रदान करण्यात आला.
बाणेर-बालेवाडी परिसरात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाचा खर्च सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय प्रल्हाद सायकर यांनी घेतला.
यावेळी भाजप नेते प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, लहू बालवडकर, भाजप उत्तर मंडलाध्यक्ष सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, श्रीकांत सायकर, अनिकेत चांदेरे आदी उपस्थित होते.















