औंध कुस्ती केंद्राच्या चार मल्लांची भारतीय संघात निवड; बेल्ट रेसलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवण्याची संधी

पुणे : दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियममध्ये युनायटेड वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनच्या (UWW) मान्यतेने आयोजित बेल्ट रेसलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी औंध कुस्ती केंद्राच्या चार मल्लांची भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे औंधच्या कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवड झालेल्या मल्लांमध्ये १५ वर्षांखालील गटातून पै. शॉन राहून दिघे याची खुल्या गटात, पै. सार्थक गणेश फुगे याची ४९ किलो वजनगटात, तर पै. अजिंक्य वासुदेव रानवडे याची ४५ किलो वजनगटात निवड झाली आहे. वरिष्ठ गटातून पै. साहिल सुधाकर आंद्रे याने ६२ किलो वजनगटात भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

औंध कुस्ती केंद्रातील चार मल्लांची भारतीय संघात निवड होणे ही केंद्रासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या मेहनतीला आणि सरावाला मिळालेले हे यश आहे. या मल्लांना वस्ताद विकास काका रानवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या यशाबद्दल सर्व मल्लांचे कुस्तीप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून अभिनंदन होत असून, आगामी जागतिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी उत्तम कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

See also  लोणावळा येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला जिल्हास्तरीय समितीकडून गती!