पुणे : छत्रपती शिवाजी महाराज नगर ते हिंजवडी या मार्गांवर धावणाऱ्या पुणे मेट्रोचे तिकीट भाडे कमी करावे, या मागणीसाठी आज भारतीय महाक्रांती सेना यांच्या वतीने मेट्रो अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हिंजवडी आयटी हबमध्ये दररोज हजारो कर्मचारी, विद्यार्थी व सामान्य नागरिक प्रवास करतात. सध्या मेट्रोचे तिकीट भाडे जास्त असल्याने सामान्य नागरिकांना, नोकरदार वर्गाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे तिकीट भाडे कमी केल्यास मेट्रो प्रवाशांची संख्या वाढेल आणि वाहतूक कोंडीही कमी होईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
यावेळी भारतीय महाक्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे सर, लीगल सेल अध्यक्ष अॅड. संजीव जाधव पाटील, प्रवीण रेणुसे, संजय परदेशी जालिंदर लोखंडे अनिल धनकुडे व इतर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
मेट्रो प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक विचार करावा, अशी मागणी भारतीय महाक्रांती सेनेने केली आहे.
















