बाणेर हाय स्ट्रीटवरील अनधिकृत पत्राशेडवर महापालिकेचा हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल करण्याचा प्रशासनाचा इशारा

बाणेर : बाणेर-बालेवाडी येथील हाय स्ट्रीट परिसरात बाणेर पोलीस ठाण्यासमोर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामांवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने ही कारवाई करत अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने उभारण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर महापालिका प्रशासनाने या अतिक्रमणांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

या कारवाईदरम्यान अतिक्रमण व बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत पत्राशेड किंवा दुकाने उभारल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

See also  स्व.अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राहुल डंबाळे यांचे मुख्यमंत्री फडणवीस व महापालिका आयुक्तांना निवेदन