अभियांत्रिकीच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचा गौरव! भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन, पुणेला प्रतिष्ठित ‘नवरत्न शिक्षण संस्थान पुरस्कार’

पुणे :गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन, पुणे या महाविद्यालयाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या व्यावसायिक उत्कृष्टता उपक्रमांतर्गत दिला जाणारा प्रतिष्ठित ‘नवरत्न शिक्षण संस्थान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संस्थात्मक विकास आणि स्त्री सक्षमीकरणासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची पावती मानला जात आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे आयोजित भव्य समारंभात महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ सेंद्रिय व जैव-सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ तसेच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), पुणेचे संस्थापक मा. प्रा. डॉ. अरविंद नातू, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल मा. श्री. नितीन धामळे तसेच युवा सक्षमीकरण आणि समाजविकास क्षेत्रातील कार्यासाठी परिचित असलेले मा. श्री. शंतनू देशपांडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, “हा पुरस्कार संपूर्ण भारती परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारती विद्यापीठाने रुजवलेल्या मूल्यांचा आणि उत्कृष्टतेच्या परंपरेचा हा गौरव असून, हा सन्मान आमच्या व्यवस्थापन, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.

महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामागे भारती विद्यापीठ व्यवस्थापनाचे दूरदर्शी नेतृत्व, धोरणात्मक मार्गदर्शन आणि खंबीर पाठबळ लाभले आहे. विशेषतः डॉ. विश्वजीत कदम, कार्यवाह, भारती विद्यापीठ, डॉ. शिवाजीराव कदम, कुलपती, भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) तसेच डॉ. अस्मिता जगताप, कार्यकारी संचालिका, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान, पुणे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे संस्थेला सातत्याने उत्कृष्टतेकडे वाटचाल करता आली.

या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल व्यवस्थापनाच्या वतीने महाविद्यालयाचे, प्राचार्यांचे, प्राध्यापकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले. “हा पुरस्कार महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, समर्पण आणि उत्कृष्ट कार्याची दखल असून भविष्यात आणखी मोठ्या यशासाठी प्रेरणादायी ठरेल,” असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.

See also  प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच उपलब्ध

दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाच्या माध्यमातून तरुणींना सक्षम, आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावरील संधींसाठी तयार करणारी अग्रगण्य संस्था म्हणून भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन, पुणे ने आपली ओळख अधिक दृढ केली असून, हा पुरस्कार महाविद्यालयाच्या गौरवशाली शैक्षणिक प्रवासातील आणखी एक सुवर्ण अध्याय ठरला आहे.

अभियांत्रिकीच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचा गौरव! भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन, पुणेला प्रतिष्ठित ‘नवरत्न शिक्षण संस्थान पुरस्कार’

पुणे, २१ नोव्हेंबर २०२६ :गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेन, पुणे या महाविद्यालयाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या व्यावसायिक उत्कृष्टता उपक्रमांतर्गत दिला जाणारा प्रतिष्ठित ‘नवरत्न शिक्षण संस्थान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संस्थात्मक विकास आणि स्त्री सक्षमीकरणासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची पावती मानला जात आहे.