पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली अतिक्रमण निर्मूलन तसेच शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
या बैठकीस शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग मुख्य अभियंता श्री. बनकर, प्रकल्प विभाग मुख्य अभियंता श्री. दिनकर गोजरे, भवन विभाग मुख्य अभियंता श्री. बिपीन शिंदे, तसेच उपायुक्त श्री. अविनाश सकपाळ, श्रीमती आशा राऊत, श्री. विजयकुमार थोरात, श्री. संदीप कदम आणि श्री. अरविंद माळी तसेच श्री. प्रसाद काटकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये शहरातील अतिक्रमणांची सद्यस्थिती, अतिक्रमण निर्मूलनासाठी करण्यात येणारी कार्यवाही तसेच रस्ते, पदपथ, दुभाजक (डिव्हायडर) आणि शहर सुशोभीकरणाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक रस्ते व पदपथ नागरिकांसाठी अडथळामुक्त ठेवणे, वाहतुकीस सुलभता निर्माण करणे तसेच शहरातील पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि सौंदर्य टिकवून ठेवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.
शहरातील अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अडथळामुक्त सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
















