PMC मेडिकल कॉलेजमध्ये भरती घोटाळा; ११ डॉक्टरांची फसवणूक

पुणे : पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायम नोकरीच्या आमिषाने ११ कंत्राटी डॉक्टरांकडून ८ ते १३ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

प्राध्यापकपदासाठी १३ लाख, सहयोगी प्राध्यापकासाठी १० लाख तर सहाय्यक प्राध्यापकासाठी ८ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने ३ डॉक्टरांनी महापौर, आयुक्त आणि लाच लुचपत खात्याकडे तक्रार केली आहे. आयुक्तांनी पोलीस तक्रार दाखल करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

See also  औंध परिसरात सौरभ कुंडलिक यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन