पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अन्न आणि औषध खात्याने ( एफडीए ) ९६ हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरींची तपासणी केली. घाणेरडे किचन, उघडे अन्न, अयोग्य साठवणूक आढळल्याने ग्रीनलँड, शैलजा, चैतन्य पराठाज, सहाना व्हेज, अनया फॅमिली, लिटिल बिस्ट्रो, फन फूड, श्रीराम वडापाव यासह १२ आस्थापनांचे परवाने निलंबित केले.तर ५ बेकायदा आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिली.
याशिवाय सिंहगड रोडवरील अँमेझॉन आणि बिगबास्केर च्या डार्क स्टोअरमध्ये एक्सपायरी लाडू, पेढे, केक सापडल्याने त्यांचेही परवाने निलंबित करण्यात आले.















