पुणे : महात्मा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीवर्षानिमित्त तसेच १३६ व्या स्मृतिदिनानिमित्त अक्षरभारती, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद औंध शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले अभिवादन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यांचल हायस्कूल, औंध-बाणेर, पुणे येथे हे कविसंमेलन पार पडले.
या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान कविवर्य प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक मुरकुटे, अध्यक्ष, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ, औंध-बाणेर, आणि ज्ञानेश्वर तापकीर, संस्थापक-अध्यक्ष, योगीराज नागरी सहकारी पतसंस्था, पुणे हे उपस्थित होते.
निमंत्रित कवी-कवयित्री म्हणून डॉ. केशव सखाराम देशमुख (नांदेड/पुणे), डॉ. स्वाती शिंदे-पवार (विटा, जि. सांगली), डॉ. संतोष पद्माकर पवार (श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), संदीप वाघोले (आळे फाटा, जि. पुणे), भीमराव धुळुबू (मिरज, जि. सांगली), अस्मिता चांदणे (पिंपरी चिंचवड) आणि दिनेश भोसले (पिंपरी चिंचवड) यांनी आपल्या रचनांमधून महात्मा फुले यांच्या विचारांना अभिवादन केले.
कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रूपाली अवचरे यांनी केले. स्वागतोत्सुक म्हणून प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, अध्यक्ष, अक्षरभारती, माधव राजगुरू, संस्थापक, अक्षरभारती, व अध्यक्ष, मसाप,औंध आणि डॉ. अविनाश सांगोलेकर, तसेच समन्वयक, महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन यांनी पुढाकार घेतला.
महात्मा फुले यांचे शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार कवितांमधून मांडण्यात आले. रसिक श्रोत्यांनी कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.















