कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे पालकमंत्र्यांच्या कडून अभिनंदन

पुणे : नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सेवा सहकारी संस्था गटातून दिलीप काळभोर (सभापती), ग्रामपंचायत गटातून रविंद्र कंद (उपसभापती), सेवा सहकारी संस्था गटातून प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे पाटील, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, नितीन दांगट, दत्ताभाऊ पायगुडे, शशिकांत गायकवाड, लक्ष्मण केसकर, मनीषा हरपळे, सारिका हरगुडे, आणि ग्रामपंचायत गटातून सुदर्शन चौधरी विजयी झाले.

या सर्वांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राहुल कुल, प्रदीप कंद‌, विकास दांगट पाटील हे देखील उपस्थित होते.

See also  " महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ .विजय भटकर यांना २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर "