” 32 स्माईल आर्थोडेंटिक केअर तर्फे ७५० वारकऱ्यांसाठी मोफत दंतचिकीत्सा शिबिर “

पुणे : पुण्यनगरीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही जंगली महाराज रोडवरील 32 स्माईल आर्थोडेंटिक केअर तर्फे वारकऱ्यांसाठी मोफत दंतचिकीत्सा शिबिर घेण्यात आले.

यावेळी 32 स्माईल आर्थोडेंटिक केअरचे मुख्य डॉ.मिलींद दर्डा यांनी हे शिबिर आयोजित केले. यावेळी डॉ मिलिंद दर्डा आणि त्यांच्या डॉक्टर सहकारी यांनी ७५० वारकऱ्यांचीमोफत दंत तपासणी करून कोणती काळजी घ्यावी यासाठी माहिती दिली.

यानंतर डॉ मिलिंद दर्डा, नगरसेविका डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, तसेच पुणे इंटक चे कायदेशीर सल्लागार ऍड फैयाज शेख, डॉ सुहासिनी सुकुमार, डॉ तृप्ती घोलप, डॉ सोनिया ढेरे, डॉ धनश्री मनकापुरे, यांच्या हस्ते वारकऱ्यांना टुथब्रश,टुथपेस्ट यांचे किट देण्यात आले.या मोफत दंतचिकीत्सा शिबिराचे आयोजन 32 स्माईल आर्थोडेंटिक केअरचे मुख्य डॉ मिलिंद दर्डा यांनी केले.तसेच शिबिरासाठी डॉ मिलिंद दर्डा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

See also  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा