बालेवाडी येथील सन होराईझन, सदाफुली सोसायटी परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी टाकी पासून नवीन पाईप लाईन; आमदारांच्या सुचना

बालेवाडी : बालेवाडी येथील सन होराईझन सोसायटी,सदाफुली सोसायटी परिसरातील भागात गेली अनेक दिवस गंभीर पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. अनेक उपाय करूनही पाणी प्रश्न सुटला नाही त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी 24×7 पाण्याच्या टाकी पासून नवीन लाईन जोडणे आवश्यक होते हि लाईन त्वरित टाकून पूर्ण करावी अशी लेखी सूचना कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. यावर पाणी पुरवठा विभागाचे मुख्यकार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी हे काम HDEP शंभर फुट लांबीची नवीन पाईप लाईन टाकून ह्या भागाचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हे काम पुढील पाच दिवसांत पूर्ण होणार आहे. तसेच बाणेर गावठाण, सोमेश्वरवाडी, कन्फर्ड झोन सोसायटी, प्रथमेश पार्क,औंध बाणेर डी पी रोड, पूना पिपलं बँक परिसर, रेगुलस सोसायटी, पॅनकार्ड क्लब रोड या भागातील पाणीप्रश्न बाबत पाठपुरावा माजी नगरसेवक अमोल बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर यांनी केला होता. या कामाची पाहणी पुणे महानगपालिकेच्या कनिष्ठ अभियंता योगिता भांबरे व परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन करण्यात आली.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले, बाणेर बालेवाडी पाणी प्रश्न संदर्भामध्ये कॅबिनेट मंत्री कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी लेखी सूचना केल्या आहेत. यामुळे आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
बाणेर गावठाण परिसरामध्ये पुरेशा दाबाने पाणी सोडण्यात येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत यावर देखील उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

See also  जिल्ह्यातीलपहिले 'मधाचे गांव' करण्यासाठी गुहिणी गावाची पाहणी