बोपोडी : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बोपोडीत उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे शहर रुग्ण सेवा समितीतर्फे दिंडीप्रमुखांना औषध पेटीचे वाटप केले गेले. औषध पेटी वाटप ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार जी गोयल तसेच माजी डी वाय एस पी अनिल जी पवार युवा कार्यकर्ते गौरव बोराडे तसेच दुर्याधनजी भापकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी समितीचे प्रमुख चेतन भुतडा, पियुष , शुभम धेंडे ,तन्मय, हर्षल , शुभम इत्यादी कार्यकर्त्यांनी सदर औषध पेटी निर्माण करण्यासाठी विशेष परिश्रम केले .यावेळी समितीच्या अध्यक्ष राजेंद्र भुतडा, चिटणीस विशाल जाधव चिटणीस प्रशांत टेके ,खडकी शिक्षण संस्थेचे संचालक रमेश अवस्थे तसेच प्राध्यापिका सुचिता दळवी उपस्थित होते .सदर औषध पेटीमध्ये सर्दी, खोकला, ताप ,अंग दुखी ,जुलाब बंद होण्याच्या गोळ्या. शक्ती पावडर तसेच टॉनिक, बँडेज व कापूस इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. सदर औषधासाठी एम क्यूआर फार्मासिटिकल कंपनी यांचे सहकार्य लाभले ,तसेच ज्येष्ठ उद्योजक अनिल मेहता व सुनील आडवाणी यांनी सहकार्य केले .सदर उपक्रम गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे शहर रुग्ण सेवा समितीतर्फे राबविण्यात येत आहे.
माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, उद्योजक कृष्णकुमार गोयल, माजी नगरसेवक शैलेजाताई खेडेकर, माजी नगरसेवक नंदलाल दिवार ,राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजय जाधव ,काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते इंद्रजीत भालेराव, विशाल जाधव ,प्रशांत जी टेके ,संभाजी शिंदे, अमोल जाधव, एडवोकेट रमेश पवळे, प्राजक्ता गायकवाड, सुंदरताई ओव्हाळ,कमल गायकवाड, मनीषा ओव्हाळ, कांता ताई ढोणे, बाबा तांबोळी ,श्रीकांत जगताप, जितेंद्र कांबळे, चेतन भुतडा, हर्षल भुतडा, शुभम भुतडा, शुभम देंडे, तन्मय भुतडा, ज्येष्ठ प्राध्यापक सुचिता दळवी, कविता तावरे, शैलेश काळे ,गिरीश ननावरे, असे अनेक जण उपस्थित होते