कोथरूड कर्वेनगर परिसरातील सोसायटीमध्ये पावसाचे पाणी शिरले आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पाहणी केली

कोथरूड : कोथरूड कर्वेनगर परिसरातील प्रतिज्ञा मंगल कार्यालय जवळील अनेक सोसायटीमध्ये मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी मोरेश्वर, स्नेहा सोसायट्यांमध्ये शिरले. तसेच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

काही सोसायटीमध्ये कमरे इतके पाणी साठल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सदर परिस्थितीची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिल्या नंतर मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे वा सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.

तसेच योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पावसाळी गटारांची स्वच्छता योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार या परिसरातील नागरिक वारंवार करत आहेत. याकडे महानगरपालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरील पाणी सोसायटीच्या आवारामध्ये येत आहे.

See also  छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात ऐतिहासिक विजयाचा शिरोळे यांना विश्वास