सरकाराने वारकरी बांधवांची माफी मागावी-( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शिवसेना मुळशी तालुक्याची मागणी

मुळशी : श्री क्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे , हजारो वर्षांपूर्वीची सुसंस्कृती असणारी वारकरी सांप्रदायक परंपरा अबाधित ठेवण्याच्या ऐवजी वारकरी सांप्रदायला गालबोट लावण्याचं पाप ह्या ईडी सरकाराने केलं आहे. वारकऱ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना शिंदे_फडणवीस सरकारच्या काळामध्ये घडली आहे, वारकरी बांधवांना पोलिसांनी केलेल्या लाठीमारच्या विरोधात सरकारच्या विरोधात शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने घोटावडे फाटा येथे भजन म्हणत आंदोलन करण्यात आले.

हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. `लवकरात लवकर माफी मागावी असे तालुकाप्रमुख सचिन खैरे म्हणाले.


यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, संतोष मोहोळ,शिवसेना जिल्हा संघटक, श्री.शंकर मांडेकर, महिला जिल्हा संघटिका संगिता पवळे,मा.जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर,मा.तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ,शिवसेना जेष्ठ नेते, नामदेव आप्पा टेमघरे,कैलास मारणे ,रामभाऊ गायकवाड,महिला तालुका संघटिका सुरेखा तोंडे,अनंता वाशिवले,लहू लायगुडे,नागेशअप्पा साखरे,अमोल मोकाशी,कालिदास शेडगे,अमोल जाधव, राम गवारे,संतोष जाधव,शिवाजी बलकवडे,दिलीप मारणे,मोहन धुमाळ,संतोष लोयरे,शंकर शेलार,रुपेश जाधव,नितीन लोयरे,पांडुरंग साठे ,सागर फाले, मयूर रानवडे,सूरज जांभुळकर,रासू शेलार, रामदास पोळेकर, उपस्थित होत.

See also  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्यावतीने 'निर्मलवारी' उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी